Pimpri: संविधान बदलण्याचे कटकारस्थान करणा-या भाजपला गाडून टाकू – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे पिंपरीत महाअधिवेशन;

एमपीसी न्यूज – केंद्र आणि राज्य सरकार गरीबी दूर करत नाही. बेरोजगारांच्या हाताला काम देत नाही. त्यांना देशातील व्यवस्था बिघडवून घटना बदलण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. भाजपने 2014 च्या बिहारच्या निवडणुकीत संविधान समिक्षणाची घोषणा केल्यानंतर भाजपचा पराभव झाला. पराभव होऊन भाजप आणि आरएसएस (संघ)वाले सुधारले नाहीत. आम्हीच सत्तेत येऊ आणि घटना बदलू असे सांगत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत संविधानाची समिक्षा करुन बदलू पाहणा-या भाजपला गाडून टाकण्याची सर्वांनी गाठ बांधली पाहिजे, असे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच काँग्रेसवाल्यांनो अगोदर आरएसएस(संघ)ला संविधानाच्या चौकटीत आणायचे ठरवू त्यानंतर जागा वाटपाचे बोलू,असेही ते म्हणाले.

पिंपरी नेहरुनगर येथील एच. ए. ग्राऊंड येथे ‘वंचित बहुजन आघाडी’चे आज (सोमवारी) महाअधिवेशन झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना आंबेडकर बोलत होते. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, अशोक सरोदे, सचिन माळी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे उपस्थित होते.

बिहारच्या निवडणुकीत भाजपने संविधानाची समिक्षण करण्याची भाषा केली. त्यानंतर हारले तरीही आरएसएस (संघ) भाजपवाले सुधारले नाहीत. आम्ही सत्तेत येऊ आणि घटना बदलणार असे सांगत राहिले आहेत. हे कटकारस्थान आपण ओळखून 2019 ला भाजपला गाडण्याची गाठ आपण बांधली पाहिजे, असे सांगत आंबेडकर म्हणाले, काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत संघाला संविधान चॅलेंज करण्याची संधी दिली. आरएसएस(संघ)ला संविधानाच्या चौकटीत कसे आणायचा हे पहिल्यांदा ठरवू, नंतर जागांचे ठरवू असे सांगितल्यावर काँग्रेस बोलायला तयार नाही.

_MPC_DIR_MPU_II
  • ‘त्या’ भाजपच्या पदाधिका-याने हत्यारे का ठेवली? ते भाजपने सांगावे
    देशात दोन वेगवेगळ्या प्रकारचे सरकार चालत आहे. एक संविधानाअंतर्गत राष्ट्रपती चालवत असून त्याला समांतर सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत आहे. पुण्यातील एल्गार परिषेदमध्ये सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल केले. पण, भाजपच्या डोंबवलीतील पदाधिका-याच्या घरी हत्यारे सापडली. ती कशासाठी साठवली होती. ते भाजपने सांगावे. सगळ्यात सुरक्षित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्यामुळेच मी त्याला समांतर सरकार म्हणतात, असेही आंबेडकर म्हणाले.

… ७० वर्षे आपण प्रतिष्ठा, अधिकारपासून वंचित राहिलो
समातंर सरकार संपविण्यासाठी काँग्रेसने पाऊले उचलली नाहीत. पहिल्यांदा हे समांतर शासन संपले पाहिजे. त्यानंतर संविधान कायम चालू राहते. संघाच्या पदाधिका-याऐवजी एखाद्या मुस्लिमाकडे हत्यारे सापडली असती तर तो आंतकवादी घोषित झाला असता असे सांगत ते म्हणाले, 70 वर्ष आपण प्रतिष्ठा, अधिकार, आमदार, खासदार, विकासांपासून वंचित राहिलो. आता आपली मान दूस-याच्या खाद्यांवर टाकायची नाही. आता आपली मान आपल्याच खांद्यावर ठेवायची आहे. त्यासाठीच सत्ता हवी आहे.

  • काँग्रेस-राष्ट्रवादी बिल्डरांची पार्टी
    पिंपरी-चिंचवड शहरात 80 झोपडपट्या आहेत. सत्ताधा-यांनी एसआरच्या नावाखाली नवीन खुराडे बांधायला सुरुवात केली आहे. झोपडपट्या उठवून बिल्डरांचा घशात जागा घातल्या जात आहेत. गरिबाला गरिब करायचे आणि श्रीमंताला श्रीमंत करायचे आहे, असे सरकारचे धोरण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी बिल्डरांची पार्टी आहे, असा आरोपही त्यांनी केला.

लोकशाहीत कुटुंबाशाही नाही, तर लोकशाहीच चालली पाहिजे
मराठा समाजातील काही कुटुंबाची सत्ता आहे. मावळातून लोकसभेसाठी कोणाचे नाव चालले आहे. नात्या-गोंत्याची सत्ता गाडल्याशिवाय राहणार नाही. ही भुमिका असली पाहिजे. लोकशाहीत कुटुंबाशाही नाही लोकशाहीच चालली पाहिजे. कर्तबगार माणून पुढे गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.