Pimpri : ध्येय ठरविल्याशिवाय जिवनात यशस्वी होणे कठीण -डॉ. बोराडे

एमपीसी न्यूज – शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे स्वप्न आधुनिक पिढीने लक्षात घेवून जीवनात स्वत:चे स्वप्न ठरविणे आवश्यक आहे. कोणत्याही ध्येयवाद ठेवल्याशिवाय जिवनात यशस्वी होणे कठीण आहे. यशस्वी होण्यासाठी आधी स्वप्न पहा, असे प्रतिपादन इतिहास संशोधक आणि गड किल्ल्यांचे गाढे अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले.

हिंजवडी येथील अकेमी बिझनेस स्कुलमध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून डॉ. प्रमोद बोराडे यांचे शिवचरित्र विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची भाषणे, पोवाडे आदी कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अभिषेक बोके, अध्यक्षा विभा बोके, प्रा. मिनू तिवारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

  • यावेळी डॉ. बोराडे यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवनात अग्रक्रम दिल्यास नक्की यशस्वी व्हाल. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिवरायांचे विचार प्रेरणादायी ठरतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमके काय करायचे हे ठरवून कष्ट घेतले, तर यश हमखास मिळेल.

आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते खूप विचार करून निवडले पाहिजे. मेहनतीसोबतच धाडस, निर्व्यसन, शुद्ध चारित्र्य या गोष्टींनाही तेवढेच महत्त्व द्यावे. सर्वच थोडे थोडे करण्यापेक्षा एकाच विषयात सखोल संशोधन केल्याने यशप्राप्ती होते. तुमच्या यशाचे आई-वडिलांनी तोंडभरून कौतुक करण्याएवढी जगात दुसरी कोणतीच गोष्ट नाही, असेही डॉ. बोराडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.