Pimpri: शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी महिला हित पहावे- ॲड. लक्ष्मण रानवडे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महिलांबाबत अत्यंत शिस्तीचे (Pimpri)कडक व कठोर धोरण राबविण्यात आल्याने महिलांना मानाचे स्थान आपोआप प्राप्त झाले .

याचा सरकारने विचार करून महिलांबाबत कठोर व कडक निःपक्षपाती धोरण आखून त्यांना संरक्षण मिळवून दयावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी शिवजयंती निमित्त केली.

एच.ए. कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मराठा सेवा(Pimpri) संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे व जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश इंगळे , सुभाष देसाई , जमील शेख ,दादाभाऊ आल्हाट व राजू आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मिना शिवतारे , उज्वला साळुंके, अविनाश शिंदे , प्रमिला ठोके , वंदना क्षिरसागर, सुधीरभाई कांबळे हे प्रमुख उपस्थित होते .

Pune: रिता इंडिया फाऊंडेशनच्या तर्फे अंध आणि दिव्यांग बांधवांसाठी “वित्तीय गुंतवणूक आणि संधी”  कार्यशाळा संपन्न

ॲड. रानवडे पुढे म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना आपण त्यांचे महात्म्य सर्वांना समजावून सांगत असतो. परंतु आता नवीन पिढीवर छत्रपतींच्या वागणुकीचे व कार्याचे संस्कार करणेची वेळ आली आहे. यामुळे नवीन पिढी आपल्या ध्येयापासून भरकटणार नाही व वाम मार्गाला जाणार नाही.
मराठा सेवा संघाचे सचिव सचिन दाभाडे, ॲड. सुनील रानवडे , कौसल्या जाधव , मंदा जोगदंड , सुरेखा शिंदे , करुणा यादव सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले. जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीमती सुलभा यादव यांनी प्रास्ताविक केले. तर राघव होजगे यांनी आभार मानले .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.