Pimpri : ‘लायन्स क्लब’ने केली गरिबांची दिवाळी गोड

एमपीसी न्यूज – ‘दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब’च्या वतीने भुकेपासून मुक्ती या उपक्रमांर्गत यंदा सुमारे एकवीसशे गरीब व गरजू कुटुंबांना मोफत ‘फुड कीट’चे वाटप करून गरिबांची दिवाळी गोड केली. आकुर्डीतील श्रमशक्ती भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे संचालक व्ही.पी नंदकुमार, माजी संचालक नरेंद्र भंडारी, प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उप प्रांतपाल नंदकुमार नाईक, अभय शास्त्री, उद्योजक सुभाष सिप्पी, प्रदीप कुलकर्णी, विनय सातपुते, चंद्रशेखर पवार, शैलेजा सांगळे, रिलिव्ह हंगर प्रकल्पप्रमुख अब्दुल जाफर समन्वयक, हरिदास नायर, व्ही.एम कबीर आदी उपस्थित होते.

या उपक्रमात रीजन १ आणि २ मधील सुमारे २० क्लब सहभागी झाले होते. सुमारे दहा लाख रुपये खर्च केला असल्याचे हरिदास नायर यांनी सांगितले. या कीटमध्ये तांदूळ,तेल,पीठ,मैदा,पोहे,मिठाई असे १४ खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिनू जाफर आणि के. हरी नारायणन यांनी केले तर, आभार विजय आगरवाल यांनी मानले. स्वागत अब्दुल जाफर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.