Pimpri : लाॅकडाऊनमुळे शहरातील नद्यांचे पाणी झाले स्वच्छ; प्रदुषणाची पातळी घटली

एमपीसी न्यूज – एकीकडे लाॅकडाऊनमध्ये सर्व जनजीवन थांबले असताना निसर्ग स्वत:च इलाज करून गोष्टी पूर्ववत करत आहे. पूर्वी पिंपरी चिंचवडमधील नद्यांची अवस्था बिकट असायची पण टाटा मोटर्स आणि इसिए यांनी मिळून लाॅकडाऊनमध्ये केलेल्या पाणी परीक्षणात शहरातील नद्यांचे पाणी स्वच्छ झाल्याचे व प्रदुषणाची पातळी सुद्धा घटल्याचे समोर आले आहे.

इसिएच्या स्वयसेवकांनी पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाची पाणी परीकक्षणासाठी अधिकृत परवानगी घेतली. त्यानुसार इसिए आणि टाटा मोटर्स यांनी 3 एप्रिल, 9 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी वेगवेगळ्या 10 ठिकाणचे शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे नमुने गोळा केले.

इसिएकडून शिकंदर घोडके आणि राहुल श्रीवास्तव तर टाटा मोटर्स पर्यावरण विभागाकडून दोन प्रतिनिधी चेअरमन इसिए विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. प्रत्येक ठिकाणचे तीन नमुने मिळून एकूण 30 नमुने टाटा मोटर्स च्या पाणी परीक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

तपासणी अहवालात नदीच्या पाण्याचा रंग पारदर्शी आणि नितळ झाल्याचे दिसून आले. तसेच पाण्याची दुर्गंधी कमी झाली आहे. मात्र मानवी मैला व साबणाचा वास अस्तित्वात आहे. नदीतील जलचर डोळ्यांनी सहज दिसू लागले आहेत.

तसेच नदी पात्रात पक्षांची हालचाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदी पात्रात पाण्याची पातळी सर्वत्र उंचावली आहे. महापालिका यंत्रणेकडून जलपर्णी हटवणे काम सुरु असल्याचे प्रत्येक वेळी दिसून आल्याचे या तपासणीत आढळून आले आहे.

असे असले तरी काही ठिकाणी, नदी पुलाच्या दोन्ही टोकांना दारूच्या बाटल्यांचा ढीग आढळून आले आहेत. नदीत राडा रोड टाकणे प्रकार चिंचवड काळेवाडी पूल परिसरात व पिंपळे निलख येथे समोर आले आहे. रस्ता साफसफाई कर्मचारी पुलावरचा अथवा रख्यावरचा कचरा नदी पात्रात ढकलून देत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनेक नाले सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया विना नदीला मिसळत आहेत. बिर्ला हॉस्पिटल बाजूने समोरून, चिखली राम झरा, सांगवी गाव, दापोडी, सीएमई, काळेवाडी पिंपरी पूल आदी ठिकाणी काळे व सफेद साबण मिश्रित पाणी आढळले‌ आहे.

शहरातील सर्व उद्योगदे बंद असल्याने आपणास औद्योगीक सांडपाणी विरहीत पाण्याचे तपासणी अहवाल वाचून धवका बसणे आपेक्षित आहे. हा तपासणी अहवाल महापालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख अभियंता संजय कुलकर्णी यांच्या कडे पुढील अभ्यासासाठी देण्यात आला आहे.

दरम्यान निसर्गात मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे हा बदल दिसून आल्याचे पर्यावरण संवर्धन संघटनेचे (इसिए) चेअरमन विकास पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.