Pimpri: लॉकडाउन! खरेदासाठी झुंबड करु नका, पाहा आयुक्त आणखी काय म्हणाले…

Lockdown! Don't rush for purchase, appeal of Municipal Commissioner : लॉकडाऊनबाबतच्या सविस्तर सुचना उद्या किंवा परवापर्यंत दिल्या जातील

एमपीसी न्यूज – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 13 ते 23  जुलै दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये केवळ पाच दिवस कडक लॉकडाउन असणार आहे. लॉकडाउन सुरु होण्यास तीन दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड करु नये. नियमांचे उल्लंघन करु नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना केले आहे.

याबाबतचा व्हिडीओ आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रसारित केला आहे. त्यामध्ये आयुक्त म्हणतात, आत्ताच लॉकडाउनची घोषणा झालेली आहे. त्यामुळे लॉकडाउन कसा असणार आहे. याबाबत अनेकांमध्ये संदेह आहे.

लॉकडाउन कसा  असे यासंदर्भात सविस्तर सूचना उद्या किंवा परवापर्यंत दिल्या जातील. पण, लॉकडाउन होणार आहे म्हणून सर्वांनी खरेदीसाठी बाजारात झुंबड करण्याची आवश्यकता नाही.  हा लॉकडाउन आत्तापर्यंत झालेल्या लॉकडाउनसारखा दिर्घ असणार नाही. हा छोटा लॉकडाउन राहणार आहे.

त्यामध्ये केवळ पाच दिवसाचाच आपल्याला कडक लॉकडाउन करावा लागणार आहे. या कालावधीत   आपल्याला अत्यावश्यक गोष्टी लागत असतील तर केवळ पाच दिवसासांसाठी तेवढ्यांचीच तजवीज ठेवावी.

नाहीतर लॉकडाउनचा जुना अनुभव घेता  अनेकजण जास्त खरेदीसाठी धडपड करतील. तसे  करु नये. कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही,  सुरक्षित अंतराचे पालन होईल,  याची खबरदारी घ्यावी.

पुढील तीन दिवस पाच दिवसाकरिता आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी वेळ आहे. तेवढ्याच गोष्टींची खरेदी करावी. उगाचच दुकानांमध्ये जाऊन झुंबड करु नका. जास्त माल खरेदीसाठी धावपळ करु नका, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like