Pimpri: लॉकडाऊन आज संपणार, ‘अनलॉक’च्या नियमावलीबाबत उत्सुकता

Pimpri: Lockdown ends today, curiosity about 'unlock' rules कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने 13 ते 23 जुलैपर्यंत दहा दिवसांकरिता लॉकडाऊन जाहीर केला होता.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने लागू केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत आज (गुरुवारी) रात्री बारा वाजता संपणार आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवार) पासून शहरात काय सुरु राहणार, काय बंद राहणार आणि कोणती बंधने असणार आहे. याबाबतची उत्सुकता आहे. त्याची नियमावली आज प्रशासनाकडून जाहीर केली जाईल.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने 13 ते 23 जुलैपर्यंत दहा दिवसांकरिता लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल पुन्हा सुरु केले जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेले शहरातील स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल, उद्याने सुरु होणार का याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.