Pimpri : पुणे जिल्ह्यातील लाॅकडाऊन ईदपर्यंत वाढवावा ; समाजवादी पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन रमजान ईद पर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.

समाजवादी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रफिक कुरेशी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात लाॅकडाऊन रमजान ईद पर्यंत चालू ठेवण्याबाबत विनंती केली आहे. मुस्लिम समाज ईद करिता नमाज अदा करण्यासाठी घरा बाहेर पडेल. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढला असा आरोप मुस्लिम समाजावर केला जाईल. त्यामुळे लाॅकडाऊनचा कालावधी रमजान ईद पर्यंत वाढविण्यात यावा,  असे कुरेशी यांचे म्हणणे आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाबाबत तबलिगी जमात अगोदरच बदनाम झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन रद्द झाले आणि ईद दिवशी लोकांनी गर्दी केली तर मुस्लिम समाज पुन्हा बदनाम होईल. तसेच दारूची दुकाने त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

समाजवादी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रफिक कुरेशी, युवक अध्यक्ष साजिद शेख, मोसिन शहा आणि एजाज शेख यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.