Pimpri Lockdown News: निर्बंध शिथिल ! शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनवाजेपर्यंत सुरू राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने आणि रुग्वाढीचा दर हा 10 टक्यांपेक्षा कमी असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसह शहरातील सर्व दुकाने उद्या (मंगळवार) पासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर, रेस्टॉरंट आणि बार घरपोच पार्सल सेवेसाठी सुरू राहतील. पीएमपीएमल बस, हॉटेल, उद्याने बंदच राहणार आहेत.

याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.

राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा 10 टक्यांपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी महापालिकांची स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी महापालिकेचा रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने पावले उचलली असून निर्बंधांसंदर्भात स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे.

आतार्पयत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु होती. परंतु आता त्या दुकानांसोबतच इतर आस्थापना म्हणजे कपडा, भाजी मार्केट, ज्वेलर्स, सलुनची दुकाने आदींसह इतर आस्थापना या सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहणार असल्याचे आदेश पारीत केले आहेत. कामांचे सर्व दिवस बँका आणि मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत. त्याची अंमलबजावणी 1 जून पासून केली जाणार आहे.

या आदेशातून मॉल्स वगळण्यात आलेले आहेत, त्यांना आपल्या आस्थापना सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हॉटेल, रेस्टॉरेन्टमध्ये पूर्वी प्रमाणोच पार्सलची सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दुपारी 2 नंतर केवळ मेडीकल दुकाने सुरु राहणार आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही 25 टक्के असणार आहे. होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे. तसंच कृषी विषयक दुकाने आठवड्याच्या सातही दिवस सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

‘हे’  राहणार सुरू ! 

# अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहातील.

# मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहातील.

# अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.

# ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.

# दुपारी 3 वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.

# सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहातील.

#मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.