Pimpri Lockdown News : लग्नाआधी मिरवणूक पडली महागात; 42 हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – लग्न समारंभाला क्षमतेपेक्षा जास्त नागरिक जमवणे तसेच लग्नाआधी मिरवणूक काढणे वऱ्हाडी मंडळींना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोन ठिकाणी दंडात्मक कारवाई केली. या दोन्ही कारवाया चिंचवडमध्ये करण्यात आल्या.

चिंचवडमधील न्यू वुड्स बॅंक्वेंट हॉल याठिकाणी सुरू असलेल्या लग्न समारंभात क्षमतेपेक्षा 32 लोक अधिक आढळून आले. त्यांच्यावर 1,000 रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे 32 हजार रुपये, तर आस्थापनेवर 10 हजार रुपये, असा एकूण 42 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच, काकडे पार्क, चिंचवड याठिकाणी लग्नाआधी मिरवणूक काढणे राजेश लोट यांना महागात पडले. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा हजार रुपये दंड वसूल केला‌.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.