Pimpri Lockdown News : मॉर्निंग वॉकच्या नावाखाली घराबाहेर पडलेल्या 92 नागरिकांवर कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या 44 नागरिकांवरही कारवाईचा बडगा

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकच्या नावाखाली घराबाहेर पडलेल्या 92, तर विनामास्क फिरणाऱ्या 44 नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज (मंगळवारी, दि.25) ही कारवाई केली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 92 नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 46 हजार रुपये दंड वसूल केला. तसेच, एक आस्थापना चालकांकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच, विना मास्क फिरणाऱ्या 44 नागरिकांवर देखील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या नागरिकांकडून पोलिसांनी 22 हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.