Pimpri : शहरात लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक सतीश गवळी यांनी प्रथम लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी शाळेतील शिक्षक राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, गंगाधर वाघमारे, कविता गायकवाड, वर्षा पाचारणे, मनीषा बोत्रे ,सुरेखा कामथे, वैशाली देसले, कुसुम पाडळे आदी उपस्थित होते.

  • यावेळी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. अमोल नवलपुरे, साधना राऊत यांनी परिक्षणाचे काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धेत वर्गानुसार प्रथम आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे : स्नेहा लोहरे, शर्वरी पाटील, श्रृती खडसे , वेदांत दंडवते , नक्षत्रा रासकर.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार , कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्राध्यापिका ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

  • क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर चिंचवड येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे गायक सुधाकर कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष गतीराम भोईर, मुख्याध्यापिका वासंती तिकोणे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बालवाडीतील पार्थ पवार याचा प्रथम क्रमांक, हर्षवर्धन गाडेकर इयत्ता पहिली द्वितीय क्रमांक, इयत्ता पाचवीतील वंश चव्हाण याचा तृतीय क्रमांक आला. या विद्यार्थ्यांनी लोक प्रबोधनातून लोककला निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी आपल्या मनोगतातून माहिती सांगितली. स्पर्धेचे परीक्षण शामला वाघमारे आणि गणेश शिंदे या शिक्षकांनी केले.

  • गायक सुधाकर कुलकर्णी यांनी प्रथम तुला वंदितो कृपाळा, निघालो घेऊन दत्ताची पालखी, कानडा राजा पंढरीचा माझे माहेर पंढरी ही गाणी सुरेल आवाजात गाऊन सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी, मी शाळेसाठी केव्हाही बोलवलं तर लगेच येईल व विद्यार्थ्यांना मोफत गायनाचे मार्गदर्शन करेल असे आश्वासन दिले. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा, आई-वडील-गुरुजन यांचा आदर सन्मान करा. असा मोलाचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गोडसे, प्रास्ताविक परिचय पुष्पा जाधव, आभार सुधाकर हांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दिपाली नाईक, सविता पाठक,सुनिता चौधरी यांनी केले. संस्थेचे व्यवस्थापक सिध्देश्वर इंगळे यांनी कार्यक्रमास भेट दिली. सेवक सुंदर मंडलिक यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.