Pimpri : लोकसभा उमेदवारांचा खर्च ; बारणे यांना पक्षाने दिले 40 लाख तर डॉ. कोल्हे यांना तिघांकडून एक लाखाची देणगी

शिवाजीराव आढळराव यांचा सर्वाधिक 65 लाख खर्च; पार्थ पवार यांनी केला 62 लाख रुपयांचा खर्च

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीतील शिरुर आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पक्षाने 40 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर, शिरुरचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना तीन व्यक्तींनी 1 लाख 12 हजार रुपयांची देणगी दिली. सर्वाधिक खर्च शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी 65 लाख 71 हजार रुपये नोंदविला आहे. पार्थ पवार यांनी केला 62 लाख रुपयांचा खर्च केला आहे.

लोकप्रतिनीधी कायदा 1951 चे कलम 77 एक नुसार उमेदवारांवर निवडणूक खर्च मर्यादेचे बंधन आहे. तो निवडणूक निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. शिरुर आणि मावळच्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचा नोंदवहीतील अंतिम तपशील प्रतिज्ञापत्रासह आयोगाला सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांचा खर्च 70 लाख रुपये खर्च मर्यादेच्या आतमध्ये आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च शिरुरचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी 65 लाख 71 हजार रुपये नोंदविला आहे. तर, सर्वांत कमी खर्च राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांचा 47 लाख 85 हजार रुपये आहे. डॉ. कोल्हे यांना तीन व्यक्तींनी 1 लाख 12 हजार रुपयांची देणगी दिल्याची नोंद आहे.

तर, मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांचा निवडणूक खर्च 62 लाख 50 हजार रुपये झाला आहे. पक्षाने त्यांच्या बँक खात्यात 40 लाख रुपये जमा केल्याची नोंद आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी 60 लाख 91 हजार रुपये एवढा खर्च नोंदविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like