Pimpri : पिंपरीगावातील घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली.

एमपीसी न्यूज – पिंपरीगावात एका फ्लॅटमध्ये चोरी करत चोरट्यांनी एक लाख 23 हजार 260 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली.

आशिष शिवाजी चांदलेकर (वय 30, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात ते गुरुवारी सकाळी नऊ या कालावधीत फिर्यादी आशिष यांचा फ्लॅट कुलूप लाऊन बंद होता. रात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 37.42 ग्राम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि मनगटी घड्याळ असा एकूण एक लाख 23 हजार 260 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.