_MPC_DIR_MPU_III

Pimpri : विश्वासू आणि मार्गदर्शक मित्र हरपला – खासदार अमोल कोल्हे

Pimpri: Lost faithful and guiding friend; MP Amol Kolhe pays homage to corporator Datta Sane

एमपीसी न्यूज – राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व तसेच विश्वासू आणि मार्गदर्शक मित्र हरपला अशी भावना व्यक्त करत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नगरसेवक दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

खासदार अमोल कोल्हे दत्ता साने यांच्या आठवणींनी उजाळा देतांना म्हणाले की, मी राजकारणात येण्यापूर्वीपासून माझे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. राजकारणात काही दिलखुलास व्यक्तिमत्त्व असतात त्यापैकी दत्त साने एक होते. मित्रत्वाच्या नात्याने मी कधीही त्यांना फोन केला तर ते मदतीला धावून यायचे. त्यामुळे एक विश्वासू आणि मार्गदर्शक मित्र हरपला अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली.

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, दत्ता साने यांचं अचानक जाणे माझ्यासाठी मोठा धक्का आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाची मोठी हानी झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.