Pimpri : आंतरशालेय हॉकी स्पर्धेत लॉयला आणि सेंट जोसेफ प्रशाला विजेते

एमपीसी न्यूज : लॉयला प्रशाला (Pimpri) आणि सेंट जोसेफ मुलांच्या प्रशाला संघाने दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मेजर ध्यानचंद मैदानावर मंगळवारी झालेल्या सामन्यात अंतिम लढतीत 14 वर्षांखालील गटात सेंट जोसेफ प्रशाला संघाने लॉयला प्रशालेचा 3-0 असा पराभव केला. सामन्याच्या 18व्या मिनिटाला स्वरद कांबळेने पेनल्टी कॉर्नरवर संघाचे खाते उघडले.

त्यानंतर दर्शन राठोडने 36 आणि निलकंठ देवळने 49व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केली. मुलांच्या 17 वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने पराभवाची परतफेड करताना सेंट जोसेफ प्रशालेचा 2-1 असा पराभव केला. मध्यंतरापर्यंत गोल शून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात उत्तरार्धातील खेळात 38व्या मिनिटाला आयन पागेदारने गोल करून लॉयला प्रशाला संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अयान सय्यदने 45व्या मिनिटाला बरोबरी साधली. मात्र, केविन अरुणने 54व्या सामन्याला गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

स्पर्धेतील 14 वर्षांखालील वयोगटात सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने शौर्य मेंगेने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर ज्योती इंग्लिश स्कूलचा 2-0 असा पराभव करून तिसरे स्थान (Pimpri) पटकावले. सेंट उर्सुला प्रशाला संघ 17 वर्षांखालील गटात तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यांनी नियोजित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर शूट-आऊटमध्ये मॉडर्न प्रशाला संघाचा 3-1 असा पराभव केला.

Pimpri

Pune : संपत्तीपेक्षा पुण्यप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करायला हवा – ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लॉयला प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि प्रिन्सिपॉल फादर केनेश मिस्किटा एस.जे. यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लॉयला प्रशालेचे प्रिन्सिपॉल फादर अनिश एसजे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन जोओशी, सदस्य अमित केंच उपस्थित होते.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके – Pune

14 वर्षांखालील संजित नार्वेकर (लॉयला प्रशाला, गोलरक्षक), आर्यन ठकार (लॉयला प्रशाला, बचावपटू), ध्रुव शहा (सेंट जोसेफ प्रशाला, मध्यरक्षक), निलकंठ देवळे (सेंट जोसेफ)
17 वर्षांखालील – रुद्रसेन खिलारे (लॉयला प्रशाला, गोलरक्षक), ओम दांगट (लॉयला प्रशाला, बचावपटू), विपुल कुंडगर (सेंट जोसेफ प्रशाला, मध्यरक्षक), आयन पागेदार (लॉयला प्रशाला,)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.