Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचे वाटप

एमपीसी न्यूज – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उद्योग सेल प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भोजनाचा लाभ सुमारे 35 ते 40 हजार भीम अनुयायांनी लाभ घेतला. यावेळी प्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरोडे हा आकर्षण ठरला. यावेळी विनोद चांदमारे, योगेश जाधव, दीपराज तोंडे, अनिकेत लुगडे, सुशांत पाटील, दत्ता बनसोडे, पिंटू भालेराव, भारत हुंडे, भरत भगत, गजभार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उद्योग सेल आठवले गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.