Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे एसटीच्या चालक, वाहकांच्या भोजनाची व्यवस्था

एमपीसी न्यूज – कार्तिकी एकादिशीनिमित्त आळंदीसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बस सोडल्या होत्या. जादा बसवरील चालक आणि वाहकांच्या भोजनाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे करण्यात आली.

कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत राज्याच्या कानाकोप-यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते. भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बस सोडल्या होत्या. बसवरील 200 चालक आणि वाहकांच्या भोजनाची रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे आळंदीतील संत गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, सेवा प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, वाहतूक निरीक्षक वर्षा डहाके, उपनिरीक्षक दत्तात्रय बारगुजे, धर्मशाळेचे ट्रस्टी माउली कदम, सहादू लोणकर उपस्थित होते.

सदाशिव काळे म्हणाले, “माउलींचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून भाविक आळंदीत दाखल झाले होते. या भाविकांना सुखरुप आळंदीत आणणे आणि परत गावी सोडविणा-या महामंडळाच्या चालक, वाहकांच्या भोजनाचे हाल होतात. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली” तसेच रोटरी क्लबच्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.