Pimpri: ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे

एमपीसी न्यूज – ग्राहक प्रबोधन समितीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी महादेव नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्राहक प्रबोधन समिती ही ग्राहकांचे हित जपण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. या अंतर्गत 14 एप्रिल 2019 रोजी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक सुहास सिद तसेच पुणे जिल्हाध्यक्ष दीपक मोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख किरण गेजगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरासाठी ग्राहक प्रबोधन समितीचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.

  • अध्यक्ष महादेव नलावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव विजय गोडसे, संपर्क प्रमुख तुषार देसडला, संघटक विकास घेवडेकर, सहसंघटक अशोक भागडे, मार्गदर्शक मंगेश पवार, सल्लागार प्रकाश सुर्व, सदस्य बाळू कराळे, पराग देसडला, भागवत भोरे यांची कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.