Pimpri : महाराष्ट्र क्लोज्ड् स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा; अभिनव सिन्हा, सानिका चौधरी यांना अग्रमानांकन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेटस् असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्लोज्ड् स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरूष आणि महिला गटामध्ये अनुक्रमे अभिनव सिन्हा आणि सानिका चौधरी यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

आयस्न्वॅश अ‍ॅकॅडमी, मुंढवा येथे शुक्रवार, १० मे पासून सुरू होणार्‍या या स्पर्धेत १२ जिल्ह्यातील १७५ खेळाडूंनी आपला सहभाग निश्‍चित केला आहे. २८ वर्षीय व भारतीय क्रमांक ८ असलेल्या अभिनव सिन्हा याला पुरूष गटाचे अग्रमानांकन देण्यात आले आहे. यांसह वरूण जॉनी याला दुसरे, अमृत दासगुप्ता याला तिसरे आणि रमेश प्रसाद याला चौथे मानांकन देण्यात आले आहे.

  • महिला गटात भारतीय क्र. ७ असलेली व परभणी येथे जन्मलेली सानिका चौधरी हिला अग्रमानांकन देण्यात आले असून पुण्याच्या निकीता अगरवाल हिला दुसरे मानांकन मिळाले आहे.

ज्युनिअर गटात (१९ वर्षाखालील गट) : भारतीय क्र. १५ असलेल्या मुंबईच्या आर्ष मेहता याला अग्रमानांकन देण्यात आले आहे. मुंबईच्याच अव्देत नाईक याला दुसरे, अर्जुन सिंग याला तिसरे आणि निरज काब्रा याला चौथे मानांकन मिळाले आहे.

स्पर्धेचे मानांकनः (१, २, ३ या क्रमानुसार) :  पुरूष गटः अभिनव सिन्हा, वरूण जॉनी, अमृत दासगुप्ता, रमेश प्रसाद, निखील जैन, संकेत पाटील, सिमरनजीत सिंग, ताथगत मल्हारे;

१९ वर्षाखालील मुलेः आर्ष मेहता, अव्देत आदीक, अर्जुन सिंग, निरज काब्रा;
१७ वर्षाखालील मुलेः मोहीत भट, अर्थव यादव, अरमान दारूखानवाला, तनय पंजाबी, अरीन खोत, अर्ष चढ्ढा, जेह पंडोल, रौनक सिंग;
१५ वर्षाखालील मुलेः पार्थ अंबानी, युवराज वाधवानी, करण पटेल, शरण पंजाबी, अभिषेक पासवान, हुनरलपाल कोहली, क्रिश देम्बला, क्रिश खंडेलवाल;
१३ वर्षाखालील मुलेः ध्रुव खन्ना, सुरेन गुप्ता, काव्य आनंद, तनिष वैद्य, आर्यन शहा, आयान केडीया, तीर्थ जिल्का, वेदांत चेड्डा;
११ वर्षाखालील मुलेः इशान दाबके, पुरव रामभिया, हृधन शहा, कनवपाल सिंग कोहली, आरव अहुजा, अर्जुन गोएंका, क्रिशिव गुप्ता, नील शहा;
महिला गटः सानिका चौधरी, निकीता अगरवाल;
१५ वर्षाखालील मुलीः सोनिया बजाज, साईशा गुप्ता, आर्या बेलसरे, प्रिनी जैन, धावनी घोयल, खुशी जसपाल, निरूपमा दुबे, तनया अहुजा;
१३ वर्षाखालील मुलीः नयना तनेजा, तिशा जसवानी, करीना फिप्स्, निया जैन;
११ वर्षाखालील मुलीः अलेना शहा, व्योमिका खंडेलवाल, अनिका दुबे, दिवा शहा, अरीका मिश्रा, अरैना भारतीय, महाथी सुब्रमण्यम, मनिषा जैन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.