Pimpri : महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी शनिवारी काळेवाडी पिंपरी येथे होणार

कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे संयोजन

एमपीसी न्यूज –   महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जालना तालिम संघ व श्री अर्जुन खोतकर यांच्या संयुक्त विद्यमाने 62 वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. 19 ते दि. 23 डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्हा जालना येथे होणार आहे. तसेच नागपूर जिल्हा तालिम संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्यावतीने 41 वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त या दोन्ही स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. काळेवाडी पिंपरी तापकीर मळा, येथील काका होम्स समोरील पटांगणात आखाडा पुजन दुपारी 3 वाजता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पिपंरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने पै. जयराम उर्फ जयवंत बाबूराव नढे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारी (दि. 7 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संजोयक व ‘ग’ प्रभाग स्विकृत सदस्य विनोद तापकीर, उपाध्यक्ष काळूराम कवीतके, संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे, आयोजक निलेश तापकीर, पै जयराम नढे, संतोष माचुत्रे,नगरसेवक अंबादास कांबळे आदी उपस्थित होते.

शनिवारी 15 डिसेंबर 2018 दुपारी 3 वाजता होणा-या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, प्रगतीशिल शेतकरी ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर, लोक लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, माजी आमदार विलास लांडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, आळंदी केसरी सचिन घोटकुले, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते राहुल आवारे, आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्कर्ष काळे, महाराष्ट्र चॅंम्पियन राजू वांजळे, उद्योजक विजय मुरकुटे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शंकर जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे आदी उपस्थित राहणार आहेत.

कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणी काळेवाडी परिसरातील नामांकित पै. बाबासाहेब धोंडीबा तापकीर, वस्ताद रामतात्या नढे,श्रीराम तात्या कोकणे, चांगदेव आप्पा नखाते, शंकरराव काळे, सुरेश नढे पाटील, महादू कोकणे, महादेव नढे, सयाजी आप्पा नढे, साधू नढे, विजय नखाते (पंच), दिलीप नखाते, शिवराम नखाते, आनंदा काळे, गुलाबराव तांबे, ज्ञानेश्वर ब. नढे, ज्ञानेश्वर बा. नढे, शंकर नखाते, विलास नखाते, हरिभाऊ नखाते,सुदामराव नखाते, कैलास काळे, माऊली काळे, शंकर आप्पा नढे, ज्ञानोबा काळे, दिलीप नढे, कृष्णा तांबे, अजय नढे, शिवराज तांबे, किशोर नखाते, देवा आप्पा नखाते, काळूराम नढे, जगदीश नढे, संतोष सुरेश नखाते, निलेश नखाते, शंकर चांदेरे, लहू कोकणे, काळूराम थोपटे, अरुण तांबे, अजय लांडगे,किरण दे. नखाते, संतोष ना. नखाते, आबा शिंदे यांना   कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या यांचे वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या संयोजनात समस्त ग्रामस्थ रहाटणी – काळेवाडी तसेच हनुमंत गावडे, आ. महेश लांडगे, दिलीप बालवडकर, धोंडिबा लांडगे, विजय गावडे,संतोष माचुत्रे, विनोद तापकीर, निलेश तापकीर, पोपटराव फुगे, विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुटे, महाद्रंग वाघेरे, आबा काकडे, राजू जाधव, दिलीप काळे,काळूराम कवितके आदींनी सहभाग घेतला आहे.

विजेत्या मल्लांना सायंकाळी 8 वाजता स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ट्रॅकसुट बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेस पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी:-
* कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेणारा हा कुस्तीगीर पिंपरी चिंचवड परिसरातील असावा.
* कुमार गटात सहभाग घेणा-या कुस्तीगीरास वयाचा दाखला आवश्यक आहे.
* स्पर्धा कुमार गट, खुला गट, अनुक्रमे गादी व माती गटात होतील.
* स्पर्धा अनुक्रमे गट ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२, ११० किलो पर्यत (कुमार गट) गादी व माती खुला गट         ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७,८६, ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट
* स्पर्धा प्रारंभ शनिवारी दि. 15 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता घेण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.