Pimpri : नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस दल सदैव तत्पर- निलेश वाघमारे

एमपीसी न्यूज – प्रत्येक सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांचे एक अतूट नाते आहे. सर्वांच्या सेवेसाठी आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याची ग्वाही संत तुकारामनगर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मायला खत्री, अभिजित गोफण, संजीवन कांबळे, महेश मांजळकर, रामभाऊ बनसोडे, अविनाश चौधरी, गौतम उजागरे, लक्ष्मण पवार, जमीर शेख, लखन काकडे, अल्ताब शेख, अर्जुन बाबर,सतीश भांडेकर, आरती सौदे, किरण माने, नितीन जोशी, दत्ता गायकवाड, मुकेश परिमल आदी उपस्थित होते.

निलेश वाघमारे म्हणाले की, पोलिसांनी नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांची माहिती व्हावी व नागरिकांशी संवाद साधला जावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोसायट्यांमध्ये कॅमेरे लावण्यावर नागरिकांनी भर द्यावा तसेच भाडेतत्वावर राहणा-यांची माहिती पोलिसांना द्यावी. व्हेरिफिकेशन करुन घ्यावे.

यावेळी मायला खत्री, संजीवन कांबळे, शंकर वीरकर, अभिजित गोफण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बंडु खाडे यांनी केले. डी. यु. ठोंगीर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.