Pimpri : महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे विविध पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी, पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षक पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा हा पुरस्कार वितरण रविवारी (दि. 9) आझम कॅम्पस पुणे येथे होणार आहे.

पुण्यातील आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगरचे मुख्याध्यापक नितीन घोगे यांना पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने देण्यात येणारा क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे. नितीन घोगे सर गेली 34 वर्ष प्रशालेत अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले आहेत. प्रशालेच्या विकासामध्यें त्यांचा मोलाचा वाटा आहे.

तसेच संत गोरोबा बालविद्या निकेतनचे शिक्षक मोमीन सर यांची आदर्श शिक्षक पञकार मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मोमीन सर मागील 20 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून शाळेत अनेक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून या पुरस्कारासाठी निवड सार्थ असल्याचे सिद्ध केले असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.

पुरस्कारांचे वितरण राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, विधान परिषद सदस्य मोहन जोशी, एसएससी बोर्ड पुणेचे विभागीय अध्यक्ष तुकाराम सुपे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.