Pimpri : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या स्वच्छता सेवा अभियान

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उद्या (बुधवारी) स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण शहरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्लास्टीक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लास्टीक मुक्त दिवाळी उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार शहरात 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोंबर 2019 दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहिम- प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती, श्रमदानातून प्लास्टीक संकलन मोहिम व रिसायकलिंग अथवा प्लास्टीक मुक्त दिवाळी या तीन टप्प्यामध्ये राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

त्यानुसार उद्या संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिक, संघटना, संस्था, शाळा, क्रीडा संकुल, क्लब्स, चित्रपट व नाटयगृहे, औदयोगिक संस्था, हॉल, शासकीय/ निमशासकीय/ खासगी कार्यालये, धार्मिक संस्था, हॉटेल, दुकानदार, मॉल्स, विक्रेता, केटरर्स, व्यापारी, फेरीवाला, वितरक,वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादकांनी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टीक व थर्माकॉल वस्तु, पेट बाटल्या संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.