Pimpri: महापालिका महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार, प्रसार करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. 11 ते 15 एप्रिल असे एकूण पाच दिवस कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे महापौर ऊषा ढोरे यांनी सांगितले.

यावेळी विविध प्रबोधनात्मक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच परिसंवाद, चर्चा सत्र, व्याख्यानमाला तसेच वक्तृत्व, निबंध स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतूकीची कोंडी होणार नाही. यासाठी उपाययोजना करणे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, युपीएससी/एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, भव्य स्टेज मंडपाची व्यवस्था करुन संपूर्ण मंडपावर पत्रे टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचबरोबर पिण्याचे स्वच्छ पाणी व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करणेबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या.

महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. महिलांसाठी पूर्ण एक दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेचे उपक्रम जास्ती जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती देणारा स्टॉल उभारणे तसेच नौकरी व उद्योगधंदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी महापौर ढोरे यांनी दिल्या.

या बैठकीला सभागृह नेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता गरगोजे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर-शिलवंत, गीता मंचरकर, नगरसदस्य संतोष लोंढे, सागर आंगोळकर, संदिप वाघेरे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, उत्तम कांबळे, निवृत्ती आरवडे, देवेंद्र तायडे, शेखर गायकवाड, बापू माने, धुराजी शिंदे, हौसराव शिंदे, माणिक निसर्गंध, प्रल्हाद कांबळे, संदिप साळवे, प्रविण कांबळे, अॅड. मिलींद कांबळे, युवराज वाघमारे, अर्जुन कदम, निलेश निकाळजे, बाळासाहेब रोकडे, प्रदिप बुक्तर, बाबा कांबळे, स्वप्नील पवार, अजय शेरखाने, दिलीप देहाडे, प्रमोद गायकवाड, विजय कांबळे, बळीराम काकडे, धम्मराज साळवे, अंजना गायकवाड, आकील मुजावर, दिलीप मोटा, सतिश पवार, शामाताई जाधव, मनोज गजभार, विनोद सरवदे, शेख कलिंदर शेख, दत्तात्रय सरकार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.