Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादल अध्यक्षपदी महेश झपके

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर सेवादल अध्यक्षपदी  महेश उत्तम झपके यांची आज (शुक्रवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे  यांच्या शिफारशीनुसार झपके यांची नियुक्ती करण्यात आली असून महेश झपके  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कमिटीमध्ये चिटणीस या पदावर मागील सहा वर्षांपासून कार्यरत होते.

मुंबई येथील प्रदेश कार्यालयात सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ‍दीपक मानकर यांच्याकडून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शहरातील जुने व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून झपके यांची ओळख असून बोपखेल येथील भक्ती शक्ती ‍मित्र मंडळच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.