Pimpri : नवनिर्वाचित महापौर माई ढोरे यांचा जाणून घ्या परिचय…..

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. भाजपच्या पहिल्या महिल्या महापौर झाल्या आहेत. जाणून घेऊ त्यांचा परिचय….

पिंपळेनिलख येथील नामदेव इंगवले या शेतकरी कुटूंबात माई ढोरे यांचा जन्म 1958 साली झाला. दहावी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्या गृहिणी आहेत. त्यांना सासर आणि माहेरकडून राजकीय वारसा मिळाला आहे.

माई ढोरे पहिल्यांदा 1992 मध्ये सांगवी गावठाण प्रभागातून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्या. काँग्रेसकडून 1995 – 1996 मध्ये उपमहापौरपद,राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2006-2007 मध्ये स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी भुषविले आहे. पीएमआरडी सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणूनही कामकाज केले आहे. भाजपाच्या महिला आघाडी प्रदेश सदस्यपदी देखील त्यांनी काम केले आहे. आता माई ढोरे शहराच्या 26 व्या महापौर झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.