Pimpri: सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी माई ढोरे, उपमहापौरपदासाठी तुषार हिंगे यांचा अर्ज
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून माई ढोरे, यांचा तर उपमहापौरपदासाठी तुषार हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या निवडीवर शुक्रवारी (दि.22) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
महापौर, उपमहापौरपदासाठी आज (सोमवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी अर्ज स्वीकारले आहेत. शुक्रवारी (दि.22) सकाळी 11 वाजता विशेष सभेत निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल कामकाज पाहणार आहेत.
माई ढोरे यांनी स्थायी समितीच्या सभापती, आणि उपमहापौरपद भूषविले आहे.