Pimpri: पुरणपोळी करा दान­­ अन् होळी करा लहान!; उपक्रमास पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज -आपण होळीच्या सणाला ज्या पुरणपोळ्या अग्नीस नैवेद्य म्हणून अर्पण करतो, त्याच पोळीने एका गरजू भुकेल्याचे पोट भरू शकते, हे साधे आणि सोपे तत्त्वज्ञान; पण त्याची अंमलबजावणी करायला निघाल्यावर किती अडथळे येतील, याची कल्पना आहे का? संस्कृतीवर घाला किंवा हिंदू धर्माचा अनादर, असे म्हणून लोकांचा विरोध होईल. मात्र, या सर्व गोष्टींची तमा न बाळगता शहरातील रॉबिनहूड आर्मी संस्थेने गरीबांच्या चेह-यावर आनंद निर्माण करण्यासाठी या रुढी आणि परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पुरणपोळी करा दान आणि होळी करा लहान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून होळीच्या दिवशी होळीला पोळी अर्पण न करता ती भुकेने व्याकूळ मुलांना दान करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थाच्यावतीने हजारो पुरणपोळींचे दान केले.

रॉबिनहूड आर्मी संस्थेकडून आठ हजार पाचशे पंच्याऐंशी पुरणपोळी दान
शहराच्या विविध भागातून पर्यावरणपुरक होळी साजरी करा, असे सांगत पुरणपोळींचे संकलन केले. या पुरणपोळ्या पिंपरी-चिंचवड परिसरातील गोरगरीबांना वाटण्यात आल्या. या त्यांच्या कार्यात रॉबिनहूड संस्थेचे सदस्य, कर्मचारी यांचा मोठा सहभाग आहे.

  • पिंपरी-चिंचवडमधील रॉबिन हूड या संस्थेने एकूण आठ हजार दोनशे पंच्याऐंशी पुरणपोळी दान केल्याचा विक्रम केला आहे. त्यात पुरणपोळी, भात, डाळ आणि गोड पदार्थांचा समावेश होता. आकुर्डी, निगडी या भागात एकूण 3785, चिंचव़ड परिसरात 2500 तर भोसरीत 2000 अशा एकूण आठ हजार दोनशे पुरणपोळ्यांचे दान करण्यात आले, अशी माहिती रॉबिनहूड आर्मीच्या प्राजक्ता रुद्रवार आणि साई तळवडेकर, विकास देशपांडे यांनी दिली.

मधुकर बच्चे युवा मंचच्या वचीने 260 पुरणपोळी दान
मधुकर बच्चे युवा मंच आणि मित्र मंडळीच्या वतीने लोकांकडून पुरणपोळी जमा करून या सणांपासून वंचित राहणाऱ्या गरीब, गरजू लोकांना पुरण पोळी ठीकठिकाणी जाऊन देण्यात आल्या. प्रत्येक वर्षी हा उपक्रम करण्यात येतो. या उपक्रमास समाजातील अनेक नागरिक स्वतःहून शक्य तशी मदत केली.

  • त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या जमा झाल्या होत्या. रावेत, निगडी, पिंपरी, चिंचवड, थेरगाव, सांगवी आदी भागात पुरण पोळीचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. भाजप रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सौरभ शिंदे, पिंपरी चिंचवड केमिस्ट अध्यक्ष संतोष खिंवसरा, सामाजिक कार्यकर्त्या कविता खिंवसरा, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे आदींनी पुढाकार घेतला.

बोर्लीकर कुटुंबियाकडूनही पुरणपोळी दान उपक्रम
निगडी प्राधिकरण येथील सेक्टर 27 येथेही पुरणपोळी दान करा उपक्रम राबविण्यात आला. होळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही होळी पर्यावरणपूरक असते. या होळीचे खास पण म्हणजे सेक्टर 27 मधील नवीन लग्न झालेल्या जोडप्याला होळी पेटवायचा मान देण्यात येतो. होळीच्या निमित्ताने सर्वजण आनंदाने गप्पा मारतात. त्यानिमित्ताने एकत्र येऊन गप्पा रंगतात. यावर्षी 35 पुरणपोळ्या जमवून त्या अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात येतात. या बोर्लीकर कुटुंबातील राधिका बोर्लीकर, रवींद्र बोर्लीकर यांचे विशेष सहकार्य असते.

  • पिंपळे गुरवमध्ये दिड हजारहून अधिक पुरणपोळ्या दान
    पुरणपोळी नैवेद्य जाळण्या ऐवजी भुकेल्या जीवाला द्या हा प्रवाह विरोधी विचाराने होळी सण साजरा करण्याचे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने ठरविण्यात आले. नवी सांगवीतील मंडळ आणि सोसायटीच्या होळीचा ठिकाणी जाऊन नागरिकांना आवाहन केले. नैवेद्य आणि नारळ होळीत न वाढवता आमच्याकडे द्या, याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातून जवळपास सुमारे दीड हजार पेक्षा जास्त पुरणपोळी जमा झाल्या.

पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्रातील 35 अंध मूलांना पुरणपोळी आणि दूध देऊन जेवण देण्यात आले. इतर निराधार व गरीबांना जेवण देण्यात आले. अंध कल्याण केंद्रातील काही मुले ही यूपीएससी, एपीएमसी, बँकींगचा अभ्यास करत आहेत. पुरणपोळीचा जेवण झाल्यावर त्यांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन हा उपक्रम राबविण्याचा हेतू सफल झाल्याचे समाधान शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी व्यक्त केले. व नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद गरजूच्या चेहऱ्यावरील समाधान बघून हा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्थाने राबवावा यासाठी जनजागृती करणार असल्याचे आण्णा जोगदंड यांनी सांगितले.

  • आळंदी येथील श्री ज्ञानेशा रेसीडेंसी सोसायटीमध्ये आळंदी शहर सचिव रवी बेनकी,दशरथ कांबळे व सभासदांनी हाच उपक्रम राबवला. यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला .यावेळी आन्ना जोगदंड, गजानन धाराशिवकर,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगिता जोगदंड, सुवर्णयुग मंडळाचे सचिव संदीप दरेकर, मुळशी महिला अध्यक्षा मीना करंजवने, युवक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, अरविंद मांगले, मुरलीधर दळवी, पंडित वनसकर, विकास शहाणे,बदाम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अभिजित टाक, सतिश इथापे, ईश्वर सोनोने, हनुमंत पंडित इत्यादीनी सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.