Pimpri: शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपयोजना करा; आमदारांची आयुक्तांना सूचना

Make strict arrangements to control the corona population in the city; MLAs' instructions to the Commissioner

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाची साखळी तोडली पाहिजे. परिस्थिती आटोक्यात आणावी. त्यासाठी कठोर उपयोजना करून कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे आणि महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत आज (शुक्रवारी) आयुक्त दालनात बैठक झाली.

आमदार लक्ष्मण जगताप,  अण्णा बनसोडे, महेश लांडगे,  महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक एकनाथ पवार, संदीप वाघेरे, नगरसेविका वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 70 ते 80 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. बुधवारी 81, गुरुवारी तब्बल 125 आणि आज 98 नवीन रुग्णांची भर पडली.

आजपर्यंत शहरातील रुग्ण संख्या 1110 वर जाऊन पोहोचली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येवर तीनही आमदारांनी चिंता व्यक्त केली. शहरातील बाजारपेठ सुरु केल्या आहेत.

मात्र, नागरिकांकडून आणि दुकानदारांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.

या बाबत प्रशासन जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठींबा असेल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना कराव्यात.

काहीही करून कोरोना परिस्थिती आटोक्यात आणावी, अशा सूचना आमदारांनी केल्या. त्यावर पोलिसांशी चर्चा करून कडक उपाययोजना करण्यातबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.