Pimpri : कुपोषित कविता अल्प‌जीवी ठरतात – डॉ.महेंद्र ठाकूर-दास

एमपीसी न्यूज – आजकाल खूपजण लिहू लागले आहेत,ही चांगली गोष्ट आहे. परंतु परिपक्वता येण्यापूर्वीच छापून मोकळे होतात. त्यामुळे असं साहित्य जनमानसात रुजत नाही आणि ते अल्पजीवी ठरते.दर्जेदार,सकस असेल तरच साहित्य दीर्घकाळ टिकून राहते, असे मत कालिदास साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.महेंद्र ठाकूर दास यांनी व्यक्त केले.

कालिदास दिनाचे औचित्य साधून समरसता साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या “साहित्य संवाद व वर्षा काव्यसंमेलनात. ज्येष्ठकवी डॉ.पराग पाथ्रूडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी साहित्य संवादमध्ये ज्येष्ठ कवयित्री माधुरी विधाटे यांच्या कवितांचे वाचन झाले. कवयित्री समृध्दी सुर्वे यांनी आपल्या माधुरी सखीशी संवाद साधला.माधुरीजींच्या गेय कवितांना रसिकांनी दाद दिली.

  • या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम पाटील,सुरेश कंक, राज अहेरराव,राजेद्र घावटे, कवी पत्रकार पितांबर लोहार, प्रदिप गांधलीकर, नंदकुमार मुरडे, समरसता परिषदेच्या अध्यक्षा शोभा जोशी, उपाध्यक्ष कैलास भैरट, प्रसिध्द कवी साहित्यिक,प्रकाशक वि ग सातपुते आदी उपस्थित होते.

कवी संमेलनात रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या कवितांचा आस्वाद घेता आला. यामध्ये राजेंद्र भागवत, सविता इंगळे, बालगोपाल वर्षा,निशिकांत गुमास्ते, अशोक कोठारी, योगिता पाखले, पुजा भडांगे, शामराव सरकाळे,आय के शेख,वाय के शेख,प्रशांत पोरे, सायली अष्टेकर, बालकवयित्री अनुष्का चिटणीस आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

  • सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मंगला पाटसकर आणि उज्वला केळकर यांनी केले. कैलास भैरट यांनी आभार मानले मानसी चिटणीस, निलेश शेंबेकर, पंजाबराव मोंढे,मोरे-प्रधान यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.