Pimpri : प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी  मारहाण करत चौघांनी मिळून एका तरुणाचा(Pimpri) खून केला आहे. ही घटना रविवारी (दि. 21) चिंचवड येथे घडली.

सुरेश लोडबा ढेंबरे (वय 21, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष चौघुले (वय 25, रा. चिंचवड), दोन महिला आणि संतोष याचा एक मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल(Pimpri) करण्यात आला आहे. संतोष याला पोलिसांनी अटक केली आहे.

Wakad : पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश ठोंबरे फिर्यादी यांचा दीर आहे. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपींनी सुरेश याला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. त्यात सुरेश गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.