Pimpri: ‘माँडेलीझ इंडिया’कडून कोरोना संकटादरम्‍यान मदतीचा हात

एमपीसी न्यूज –  माँडेलीझ इंडिया या कॅडबरी डेअरी मिल्‍क, बॉर्नविटा, ओरिओ इत्‍यादी सारख्‍या भारताच्‍या आवडत्‍या स्‍नॅकिंग ब्रॅण्‍ड्सच्‍या उत्‍पादक कंपनीने सध्‍या सुरू असलेल्‍या कोरोनाच्या संकटामध्‍ये मदतीचा हात म्‍हणून त्‍वरित रिलीफ योगदानाची घोषणा केली. देशामध्‍ये जवळपास 75 वर्षांचा प्रबळ वारसा असलेली कंपनी माँडेलीझ इंडिया स्‍थानिक अधिका-यांना साह्य करण्‍याशी कटिबद्ध आहे.

कंपनी जवळपास 1800 रिलीफ किट्स दान करणार आहे. या किट्समध्‍ये आवश्‍यक मास्‍क्स व सॅनिटायझर्ससोबत चॉकलेट्स, बिस्किटे व टँग सारख्‍या काही स्‍नॅक उत्‍पादनांचा समावेश आहे. कंपनी हिमाचल प्रदेश, मध्‍यप्रदेश, आंध्रप्रदेश व महाराष्‍ट्र येथील त्‍यांच्‍या कार्यरत कारखान्‍यांच्‍या आसपासच्‍या भागांमध्‍ये या किट्सचे वाटप करणार आहे. इंदुरीमध्‍ये सद्यस्थितीचा सामना करण्‍यासाठी मदत करणारे प्रमुख स्‍थानिक अधिकारी, मेडिकल प्रोफेशनल्‍स यांना जवळपास 205 रिलीफ किट्सचे वाटप करण्‍यात येईल.

माँडेलीझ इंडियाचा प्रवक्‍ता म्‍हणाला, माँडेलीझ इंडियामध्‍ये आपले लोक व आपल्‍या समुदायांसाठी मदत केली जात आहे. आम्‍ही या संकटाच्‍या काळामध्‍ये नागरिकांचे संरक्षण करण्‍यासाठी झटणा-या स्‍थानिक अधिका-यांना आवश्‍यक सुविधा देत साह्य करत आहोत. आम्‍ही नागरिकांचे संरक्षण करण्‍यासाठी अथक मेहनत घेणारे भारतभरातील वैद्यकीय सेवा प्रदाता आणि  पोलिसांमधील समर्पितता व व्‍यावसायिकता पाहून अत्‍यंत कृतज्ञ आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.