Pimpri : शिक्षण समिती सभापतीपदी मनीषा पवार यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदी भाजपच्या मनीषा पवार यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली. शिक्षण समितीच्या त्या दुसऱ्या सभापती आहेत.

शिक्षण समिती सभापतीपदासाठी सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. सत्ताधारी भाजपच्या मनीषा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. विरोधकांनी अर्ज भरला नसल्याने पवार यांची बिनविरोध निवड निश्चित होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.

महापालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात दुपारी बारा वाजता सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया झाली. पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.