Pimpri: शिक्षण समिती सभापतीपदी मनीषा पवार यांची बिनविरोध निवड निश्चित; गुरुवारी होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या मनीषा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधकांनी अर्ज भरला नसल्याने पवार यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर अधिकृतरित्या गुरुवारी शिक्कामोर्तब होईल.

महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी आज सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. यावेळेत भाजपच्या मनीषा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून चंदा लोखंडे तर अनुमोदक म्हणून सागर गवळी यांची स्वाक्षरी आहे. तर, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पवार यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

  • सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक 9 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता महापालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.