BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मनिषा संदीप गाडे-मराठे ‘गुरुगौरव शिक्षकरत्न’ पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद 2019 आणि पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे थाटात पार पडला. संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, व्यावसायिक, महिला सक्षमीकरण, कुशल नेतृत्व आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणिजनांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात पुणे जिल्हा प्राथमिक शाळा नाणे मावळ येथे कार्यरत असणाऱ्या आदर्श शिक्षिका मनिषा संदीप गाडे-मराठे यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गाडे यांना यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने व पंचायत समिती मावळ यांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा तज्ञ मार्गदर्शक, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. हा पुरस्कार त्यांनी आपले आई-वडील सुशीला व मनोहर मराठे, भाऊ संतोष आणि पती संदीप यांच्या प्रेरणेमुळे मिळाल्याचे सांगितले. तसेच, वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रसिध्द साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर आणि सुप्रसिद्ध कवी रमेश आव्हाड या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थान गुणिजन परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांनी भूषवले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like