Pimpri News : संदीप पाठक यांनी मुलाखतीत उलगडला त्यांचा रांगडा बाज

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील काळेवाडी परिसरात मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून एक दिवसीय मातंग ऋषी साहित्य संमेलन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.(Pimpri News) या एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक जाहीर मुलाखत घेण्यात आली, मुलाखतीमध्ये संदीप पाठक यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव ते मुंबई चित्रपट नगरीचा रांगडा बाज त्यांनी सांगितला.

मुलाखतीची सुरुवातच डान्स महाराष्ट्र डान्स या रियालिटी शोच्या प्रसिद्ध डायलॉगने करण्यात आली. ती अशी माजलगावच्या दगडफुला …. त्यानंतर मुलाखत कार यांनी अभिनेते संदीप पाठक यांना असे विचारले की लहानपणी त्यांना केव्हा अशी जाणीव झाली की आपण अभिनेते व्हावं. कारण घरामध्ये आई-वडील दोघेही प्राध्यापक असल्यामुळे अत्यंत शैक्षणिक वातावरण होते. या प्रश्नाचे उत्तर देताना संदीप पाठक यांनी सांगितले त्यांच्या घरामध्ये जरी शैक्षणिक वातावरण होतं तरीदेखील घरात कलेची आणि साहित्याची सतत चर्चा होत असे.

Pimpri News : ‘आर्किटेक्ट’मुळे मिळेल जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल – प्रिया गोखले 

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव हे आमचं गाव. घरामध्ये आजोबांपासून पौरोहित्य करणे असा व्यवसाय होता. त्यामुळे ते आजोबा अत्यंक पारंपारिक विचारांचे होते. त्यामुळे वडिलांचे आणि त्यांचे फारसं कधी पटलं नाही.  वडिल मराठीचे प्राध्यापक, लेखक, वक्ते होते. ते स्वतः एकांकिका बसवायचे त्यांनादेखील नाटकाची आवड होती. घरामध्ये अत्यंत पुरोगामी आणि पुढारलेले वातावरण होते.(Pimpri News) घरामध्ये लहानपणापासून सर्व जाती धर्माचे लोकांता राबता असायचा. परिसरामध्ये कोणीही दिग्गज कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणीही आले तर त्यांचे सर्वांचे मुक्कामाचे ठिकाण हे आमचे घर असायचे. त्यामुळे लहानपणीच खूप प्रतिभावान व कलावंतांचा सहवास लाभला. असं असलं तरी लहानपण हे अगदी अल्लड पद्धतीने गेले. मी लहानपणी खूप खोड्या केल्या.

पुढे गावातील सगळ्याच सांस्कृतिक कायक्रमांमध्ये सहभागी होत असे. गावातील गणपती असो वा शाळेमधील स्नेहसंमेलन सगळ्यामध्येच सहभागी होत असे. बारावीनंतर मी वडिलांना सांगितलं मी मला अभिनयामध्ये करियर करायचं आहे. त्यानंतर औरंगाबादच्या एस.बी कॉलेजला बॅचलर इन आर्ट (ड्रामा), त्यानंतर पुण्याला ललित कला केंद्रामध्ये मास्टर इन आर्टस (ड्रामा) असे शिक्षण घेतले. त्यानंतर मग मुंबईला काम मिळविण्यासाठी गेलो. या काळातच वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. पुण्याला त्यांच्यावर उपचार करण्यात आले.(Pimpri News) हाती काम नव्हतं. संघर्ष अजून सुरुच होता. वडिलांची प्रकृती खूप खालावली होती. एक दिवशी काम करताना जाणवलं की मला वडिलांना भेटायला गेलं पाहिजे. त्यादिवशी वडिलांना भेटलो त्यांच्याशी बोललो अन् ते गेले. त्यानंतर मात्र घरावर झालेलं कर्ज फेडलं पाहिजे यासाठी जोमाने कामाला लागतो. वांद्र्याला फक्त रात्र काढण्यासाठी तीनशे रुपये भाड्याने जागा होती तीथे मी राहत असे. त्यावेळी अनेक चित्रपट नाटकांमध्ये काम केलं.

त्यानंतर आयुष्यात वऱ्हाड आलं. लक्ष्मणराव देशपांडेच्या पत्नीकडून मला वऱ्हाड करशील का अशी ऑफर आली होती. खूप विचार केला. हे आपल्याला पेलेल का कारण अडिच तास 54 व्यक्ती रेखा ताकतीनं उभ्या करणं सोपं नव्हतं. मी वऱ्हाडच्या तयारी साठी एक महिना कुणालाही न सांगता नाशिकला राहयाला गेलो. त्या एक महिन्यामध्ये मी पूर्ण वऱ्हाडच्या संपूर्ण व्यक्तीरेखा आतमध्ये पूर्ण उतरविल्या. त्यानंतरच मी रसिक प्रेक्षकांसमोर उभा राहिलो. वऱ्हाडनं मला स्थैर्य दिल, पैसा दिला, समाधान दिलं. अजूनही प्रवास संपलेला नाही. या प्रवासात एक माणूस म्हणून मी समाजासाठी काही देणं लागतो. या भावनेतूनच रक्तदानाची मोहिम सुरु केली आहे. संमेलनाचे आयोजनक डॉ.धनंजय भिसे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.