Pimpri : कोरोना विषयी मराठी कलाकारांनी केलेले हे आवाहन एकदा बघाच (व्हिडिओ)

0

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या विरुद्ध सर्व जग लढा देत आहेत त्याच पार्श्ववभूमीवर भारतात रविवारी (दि 22) जनता कर्फ्यू चे पालन केले. महाराष्ट्र सरकारने लगेचच एक पाऊल पुढे टाकत आज पहाटे पासून 144 कलम लागू केले. त्यानुसार महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही कोरोनाचा धोका अजून टळला नाही त्यामुळे बॉलीवूड पाठोपाठ आता मराठी कलाकारांनी सुद्धा कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जनतेला आवाहन केले आहे.

स्वप्नील जोशी ने आपल्या ट्विटर अकाउंट व इंस्टाग्राम अकाउंट एक व्हिडिओ शेयर केलं असून या व्हिडिओ मध्ये मराठी चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांनी सर्व नागरिकांना कोरोना विषाणू बद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, सिद्दार्थ जाधव, रवी जाधव, अमृता खानविलकर, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, प्रसाद ओक, सुबोध भावे, सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, मुक्त बर्वे, सई ताम्हणकर व तेजस्विनी पंडित यांचा सहभाग आहे.

 

या व्हिडिओमधून हे कलाकार सर्व नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे व सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनापासून बचावासाठी जागरूक राहणे आणि योग्य काळजी घेणे हाच पर्याय असल्याचे ते सुचवतात.

 

HB_POST_END_FTR-A2
You might also like