Pimpri : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

एमपीसी न्यूज- मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती व पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मराठवाड्यातील नागरिकांच्या वतीने 71 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर राहुल जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अशोक काशिद, डॉ.विवेक मुगळीकर, व्यंकटराव भदाले, ओमप्रकाश पेठे, अमृत सावंत, डी.एस.राठोड, अरुण पवार, दत्तात्रय जगताप, लक्ष्मण उंडे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नरेंद्र माने, गोपाळ माळेकर, शारदा मुंडे, नगरसेविका उंडे, तुकाराम महाराज, तांदळे महाराज, सूर्यकांत कुरुलकर, सुनील काकडे, शंकर तांबे, श्रीमंत जगताप, बळीराम माळी, मराठवाडा जनविकास संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

माजी सैनिकांचा संविधानाची प्रत व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच धैर्यशील बुवा यांची नगररचनाकार म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडला. यावेळी सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करत समाज व देशासाठी पुढे येण्याचे तरुणांना आवाहन केले.

स्वराज तांबे या बालकलाकाराने स्वातंत्र्य वीरांसाठी गीत सादर केले. अरुण पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केेेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन भरगंडे आणि अलका जोशी यांनी केले. नितीन चिलवंत यांनी कार्यक्रमाची सांगता पसायदान म्हणून केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.