Pimpri : मराठवाडा जनविकास संघातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना ज्वारी व हरभरा थैलीचे वाटप

एमपीसी न्यूज – मराठवाडा जनविकास संघ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या स्मरणार्थ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब व भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणा-या शहीद सैनिकांचे कुटुंब यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ज्वारी व हरभरा थैलींचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

बब्रुवान वाघ महाराज यांच्या हस्ते जय जवान जय किसान बियाणे दान करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, राजेंद्र महाराज मोरे, नगरसेवक सचिन रोचकरी, पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे, राजपूत समाज संगठन पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, संजय सुर्यवंशी, शिवाजी सुतार, व्यंकट हैतगे उपस्थित होते.

मराठवाडा जनविकास संघातर्फे नेहमी गोरगरीब लोकांची, मुक्या जनावरांची, पर्यावरणाची,सेवा करून एक प्रकारे देशसेवा करण्याचे व्रत घेतले आहे. कर्मभूमीत समाज सेवा करत करत आपली जन्मभूमी असलेल्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब व शहीद सैनिक यांच्या कुटुंबासाठी दरवर्षी मोफत बियाणे वाटप, हुशार विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक मदत, गरीब रूग्णांना औषधींची मदत, वृक्षारोपण, रक्तदान, नोकरी विषयक रोजगार मेळाव्यांच आयोजन केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1