Pimpri : शहीद जवानांना मराठवाडा जनविकास संघातर्फे श्रद्धांजली

बुलढाण्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक्कावन्न हजाराची मदत

एमपीसी न्यूज – काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना पिंपळे गुरवमधील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जखमी जवानांची प्रकृती सुधारावी, यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांच्या कुटूंबियांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी जाहीर केले. ही आर्थिक मदत या जवानांच्या घरी जाऊन देण्यात येणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.

  • यावेळी भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, संपत गर्जे, गणेश ढाकणे, अनिस पठाण, बाळासाहेब धावणे, कृष्णाजी खडसे, प्रकाश बंडेवार, रमेश जाधव, डॉ. दिनेश गाडेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली. अरुण पवार म्हणाले, की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन शहीद जवानांच्या कुटुंबियाना प्रत्यक्ष गावी जाऊन प्रत्येकी एक्कावन्न हजाराची मदत देणार आहोत. या जवानांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे. देशाने या रूपाने मौल्यवान हिरे गमावले आहेत.

शाहिद जवानांना कष्टकरी जनतेच्या वतीने श्रद्धांजली
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी येतील महात्मा फुले पुतळा तेथे श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली , या वेळी कष्टकरी महिला पुरुषांनी मेणबत्ती पेटून शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व झालेल्या हल्या बद्दल दहशतवादी अतिरेक्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

  • ‘शाहिद जवान अमर रहे, भारत माता कि जय, भ्याड हल्ला करणा-या अतिरेक्यांचा धिक्कार असो’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, कार्यध्याक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, सदिपान झोबाडे, विक्की तामचिकर, सविता लोंढे, मंगल जाधव, रेशमा काळे, सुशिला मोरे, कमल घोडके, मंगल कांबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.