Pimpri : मराठवाडा जनविकास संघातर्फे वधू-वर सूचक केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – मराठवाडा जनविकास संघ हा सामाजिक कार्य करणारा संघ म्हणून ओळखला जातो आहे. या संघाच्या वतीने जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त सर्व जाती धर्मीयांसाठी वधू-वर सूचक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात करण्यात आले होते. केंद्राचे उद्घाटन एनजीओ फेडरेशनच्या अध्यक्षा प्रिती काळे तसेच इंटरनॅशनल मेंबर-वर्ड.कॉ आणि पार्लमेंट असोसिएशन यु.एल.ए.च्या कांचन वीर यांच्या हस्ते करण्यात आले.

  • यावेळी संघाचे अध्यक्ष अरूण पवार, नगरसेवक गोपाळ मळेकर, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सुनिल काकडे, प्रा. संपत गर्जे, नामदेव पवार, माधव मनोरे, विजय सोनवणे, राहूल इंगळे, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ सदस्य, भरवनाथ जेष्ठ नागरिक संघ सदस्य, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ आदी उपस्थित होते.

यावेळी अरूण पवार म्हणाले, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकं स्थायिक झाले आहेत. धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना आपल्या जन्मभूमीकडे जाण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे गावाकडील लोकांचा संपर्क होत नाही. यासर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या विवाह जुळवणीच्या वेळी होतो. याच समस्या दूर करण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने सर्व जाती धर्मीयांसाठी वधू-वर सूचक केंद्र सुरु केले आहे. भविष्यात या वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून मराठवाडा जनविकास संघ सामुदायिक विवाहांचे सुध्दा आयोजन करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम माळी तर सूत्रसंचालन सूर्यकांत कुरूळकर यांनी तर, आभार वामन भरगंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.