Pimpri : सुरक्षा रक्षक आणि बाऊंसर यांच्याकडून पोलिसांना मास्क वाटप

एमपीसी न्यूज – एसके ग्रुपचे सुरक्षा रक्षक आणि बाऊंसर यांच्याकडून पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंकित गुन्हे अन्वेषण विभाग क्रमांक 1 यांना मास्क वाटप करण्यात आले.

करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन एसके ग्रुपचे तांगडे यांनी केले आहे.

यावेळी एसके ग्रुपचे स्वप्नील कांबळे, राजू वारभुवन, बापूसाहेब सरोदे, सुमित मोरे, इरफान काझी, परमिंदर सिंग बाद तसेच पोलिस निरीक्षक काळूराम लांडगे, सचिन विश्वास मोरे, बाळूसाहेब कोकाटे, प्रमोद गर्जे, आप्पा लांडे, अमित गायकवाड व युनिट 1 चे इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.