Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 62 रुग्ण; ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वात कमी तीन रुग्ण

Pimpri: Maximum 62 patients in 'A' zonal office limits; At least three patients in 'C' zonal office limits शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला 280 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  ‘अ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत येत असलेला आनंदनगर झोपडपट्टी परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. आनंदरनगरमध्ये तब्बल 60 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. ‘अ’ प्रभाग हद्दीत सर्वाधिक 62 रुग्ण असून शहराचे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे. तर, सर्वात कमी म्हणजेच तीन रुग्ण ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.  दरम्यान, शहराच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील परिसरात  कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 280 वर पोहचला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दररोज शहराच्या विविध भागात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या अडीचशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 280 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  शहरातील 111 सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी पॉझिटीव्ह पण 93 रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत. 9 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून तीघांची प्रकृती गंभीर आहे. तर, सात जणांचा मृत्यू आजपर्यंत झाला आहे.

तर, 162 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेल्या ‘अ’ प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढता वाढतच आहेत. प्रभागातील आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. आनंदनगरमध्ये 60 रुग्ण सापडले असून परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. प्रभागात सर्वाधिक 62 रुग्ण  आहेत. तर, ‘अ’ प्रभाग हद्दीतीलीच निगडी, प्राधिकरणात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. ही समाधानाची बाब आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वाधिक 62 रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. प्रभागातील आनंदनगर परिसरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सहा सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी), धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे चार रुग्ण आहेत)

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे चार सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे  14 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून आज सहा सक्रिय रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे सात सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच तीन रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.