BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: …. तर पीएमपीला ‘छदाम’ ही देणार नाही – महापौर जाधव 

पीएमपीएमएल प्रशासनाला महापौरांचा इशारा 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज –  पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) प्रशासनाकडून कारभार करताना विश्वासात घेतले जात नाही. मनमानी पद्धतीने कारभार केला जात आहे. पिंपरी महापालिकेला अंधारात ठेऊन महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. गैरव्यहाराचे आरोप असलेल्या अधिका-याला वाहतूक व्यवस्थापक पदाचा चुकीच्या पद्धतीने पदभार देण्यात असून हे अत्यंत चुकीचे आहे. असा मनमानी पद्धतीने कारभार केल्यास यापुढे पीएमपीएलला महापालिकेकडून एक छदाम देखील दिला जाणार नाही, असा इशारा महापौर राहुल जाधव यांनी पीएमपी प्रशासनाला दिला आहे.

पीएमपीएमएलचे सुनील गवळी यांच्यावर गैरव्यहाराचा आरोप असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत गवळी यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार देण्यात येवू नये, अशी मागणी देखील दोनदिवसांपूर्वी महापौर जाधव यांनी केली होती. तरीदेखील त्यांच्याकडे पदभार देण्यात आला. याबाबत महापौर जाधव यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंड यांना दुरध्वनी करुन विचारणा केली . चौकशीच्या अधिन राहून त्यांच्याकडे पदभार दिला असल्याचे, गुंडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावर महापौरांचे समाधान झाले नाही.

पीएमपीएमएल प्रशासन जर कोणतीही चर्चा न करता केवळ अनुभव आहे म्हणून गैरव्यहाराचा आरोप असणा-या व्यक्तीकडे पदभार देणार असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. अंधारात ठेवून निर्णय घेणे चुकीचे आहे. विश्वासात न घेता कामकाज करणार असाल तर पीएमपीएलने महापालिकेकडून निधीची अपेक्षा करु नये. मनमानी पद्धतीने महत्वाचे निर्णय घेणार असाल तर तुमचे तुम्हीच पीएमपीएल चालवा, आम्हाला निधी मागू नका, असे महापौर जाधव यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला खडसावले.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारितील अनुक्रमे पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे 2007 साली एकत्रीकरण करून, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये पुणे महापालिका 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 टक्के संचलन तुट भरते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.