Pimpri : दिवंगत महापौर भिकू वाघेरे प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी पुरस्कार वितरण

संत सेवक बाळासाहेब महादू वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड "समाजभूषण" पुरस्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी गावात स्मृतीदिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार यंदा संतसेवक  बाळासाहेब महादू वाघेरे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भिकू वाघेरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, विलास व-हाडे, इंदाजी गोलांडे हणमंत वाघेरे आदी यावेळी उपस्थित होते.

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या 33 स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (दि. ६) सकाळी नऊ वाजता महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.

  • युवा नेते पार्थ पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत नवहाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता  संत सेवक बाळासाहेब महादू वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

  • तसेच नितीन नाणेकर यांच्या वतीने कै. अहिल्याबाई नाणेकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती पार्वतीबाई पुरुषोत्तम ऊर्फ अप्पासाहेब कर्पे यांना आदर्श माता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.