BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापौर चषक; 59 वी राष्ट्रीय बॉडी बिल्‍डिंग स्पर्धेसाठी 33 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या सहकार्याने महापौर चषक 59 वी राष्ट्रीय बॉडी बिल्‍डिंग (वरिष्ठ) स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 32 लाख 90 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 28जून, 29 जून 2019 रोजी महापौर चषक 59 वी राष्ट्रीय बॉडी बिल्‍डिंग (वरिष्ठ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 32 लाख 90 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये पंच व पदाधिकारी मानधन खर्च अंदाजे 73 हजार, रोख बक्षिसे तीन लाख 5 हजार, विजेत्या खेळाडूंना द्यावयाची प्रमाणपत्रे 8 हजार, निमंत्रणपत्रिका हॅण्डबिल छपाई खर्च एक हजार, चहापान व अल्पोपहार खर्च 20 हजार, पंच, पदाधिकारी प्रवास भत्ता एक लाख, दैनिक भोजन भत्ता 70 हजार, खेळाडू प्रवास भत्ता एक लाख 50 हजार, खेळाडू दैनिक भोजन भत्ता दोन लाख 10 हजार, स्टेशनरी क्रीडा साहित्य झेरॉक्स खर्च व किरकोळ खर्च 20 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

  • कार्यक्रमाचे फलक लावण्यासाठी एक लाख, सत्कारासाठी पुस्तके, रोपे खरेदी, पूजा साहित्य, नारळ खर्च 20 हजार, क्रीडा संघटनांना द्यावयाची स्पर्धा मान्यता फी दोन लाख, पत्रकार परिषद चहा, अल्पोपहार, भोजन खर्च 50 हजार, फोटो, व्हिडीओ शुटींग खर्च 20 हजार आणि प्रेक्षागृहाचे दोन दिवसाचे भाडे 70 हजार रुपये असा 32 लाख 90 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे.

या अंदाचे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. हा खर्च क्रीडा विभागाच्या महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा या लेखाशिर्षावर खर्ची टाकला जाणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3