Pimpri: खुद्द महापौर, आयुक्तांनाच ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विसर

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करायला सांगणा-या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा ढोरे  यांनाच ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विसर पडलायचे पाहायला मिळाले.  त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराविरुध्द यशस्वी लढा देण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. त्याची महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पाहणी केली. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी  नीलकंठ पोमण, सहाय्यक अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोराडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला. यावेळी पाच फुटाचे अंतर ठेवण्यात आले नाही. खुद्द आयुक्त, महापौरांसह पदाधिका-यांकडूनच सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याने नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. दरम्यान, यापुर्वी देखील एकदा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला होता. त्यामुळे प्रशासनाचाच बेजाबदारपण दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.