Pimpri : अनधिकृत नळजोडांवर कारवाई करा – महापौरांचा प्रशासनाला आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत नळजोड शोधा. त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिला. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांकडून जादा पैसे घेऊन जास्तीचे पाणी सोडणाऱ्या व्हॉल्व्हमनवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महापालिकेच्या बुधवारी (दि. 21) झालेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर साडेसात तास चर्चा झाली. नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा खुलासा झाल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले.

शहरातील अनधिकृत नळजोड शोधून काढा. अधिकृत करा किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पाण्याची चोरी, जास्त वापर होऊ देऊ नका. शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. गृहनिर्माण सोसायट्यांकडून जादा पैसे घेऊन जास्तीचे पाणी सोडणाऱ्या व्हॉल्व्हमनवर कारवाई करावी.

चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी खोदलेले रस्ते तातडीने बुजविण्यात यावेत. रस्ते न बुजविणाऱ्या ठेकेदारांना “ब्लॅक लिस्ट’ करावे, असे आदेशही महापौर जाधव यांना दिला. तसेच नदी, नाल्यावर टाकलेले भराव काढून टाकावेत. भविष्यात भराव होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.