Pimpri: पवना धरणावर महापौरांचा गोळीबारचा सराव!; महापौरांकडून मात्र इन्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पवना धरणावर नवीन पिस्तूलातून गोळीबारचा सराव केला. दोन राउंड फायर केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत महापौर राहुल जाधव यांना विचारले असता याचा त्यांनी इन्कार केला आहे.

महापौर जाधव, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी आज पवना धरणावर जाऊन जलपूजन केले. त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतल्यावर महापौरांनी नवे कोरे पिस्तूल बाहेर काढले. त्यांनी चार महिन्यापूर्वी पिस्तूल घेतले होते.

  • या पिस्तूलाची माहिती कार्यकर्ते, अधिकारी यांना दिली. तसेच त्यांनी अतिउत्साहाच्या भरात हवेत दोन राउंड फायर केले. हास्यविनोदात रंगलेल्या उपस्थितांची चांगलीच तंतरली.

गोळीबार प्रकरणाबाबत महापौर राहुल जाधव म्हणाले, मी कोणताही गोळीबार केलेला नाही.याबाबत होणाऱ्या चौकशीला मी सामोरे जाण्यास माझी तयारी आहे. माझ्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. काही लोकांनी विचारले. त्यामुळे उत्सुक्ततेपोटी त्याची माहिती लोकांना दिली. त्यासाठी पिस्तूल हातात घेतले होते. आपण फायर केला असल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.